अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना १०० कोटी देणार : धनंजय मुंडे - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, August 30, 2020

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना १०० कोटी देणार : धनंजय मुंडे

 


मुंबई  : अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना येत्या वर्षभरात १०० कोटी रुपये मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असून त्यातील १३३ नवउद्योजकांना आठ दिवसांत १२.९८ कोटीचा मार्जिन मनी वितरीत करण्यात येणार, असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.


मंत्रालयात सामाजिक न्याय विभागातील १३३ नवउद्योजकांना मार्जिन मनी मिळणे बाबत व सामाजिक न्याय विभागाच्या लघुउद्योजक यांच्यासाठी असलेल्या योजना बाबत आढावा बैठकीत धनंजय मुंडे बोलत होते.

 

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना कोणत्या प्रकाराचे लघुउद्योग सुरू करता येतील त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, आर्थिक सहाय्य यांचा कृतीआराखडा तयार करण्यासाठी विभागाचे सचिव, समाजकल्याण आयुक्त, डिक्कीचे प्रतिनिधी, लीडकॉमचे प्रतिनिधी तसेच बँकर्स यांची संयुक्त समिती स्थापन केली आहे. समिती कृती आराखडा तयार करून पुढील बैठकीत अहवाल सादर करेल. जिथे कच्चा माल उपलब्ध असेल तिथे त्याचे उत्पादन करून मोठ्या महानगरात बाजारपेठ उपलब्ध करणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबतही प्रयत्न केला जाईल, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->