पॉलिटेक्निकच्या ऑनलाईन प्रवेशासाठी 15 दिवसांची मुदतवाढ - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, August 26, 2020

पॉलिटेक्निकच्या ऑनलाईन प्रवेशासाठी 15 दिवसांची मुदतवाढ

 


मुंबई : पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरण्याची मंगळवारी अंतिम तारीख होती. परंतु संसर्गजन्य कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे मिळण्यासाठी वेळ लागत असल्याने पॉलिटेक्निकच्या ऑनलाईन प्रवेशाची मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पॉलिटेक्निकच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.


दहावीनंतर पॉलिटेक्निक प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. परंतु कोरोनामुळे विद्यार्थ्यांकडे क्रिमीलेअरच्या प्रमाणपत्रासह अनेक आवश्यक कागदपत्रे जमा झालेली नाहीत. त्यामुळे या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी पालकांतून सातत्याने होत होती. अखेर पॉलिटेक्निकच्या ऑनलाईन प्रवेशासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->