कोल्हापूर जिल्हयात 22 बंधारे पाण्याखाली - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 24, 2020

कोल्हापूर जिल्हयात 22 बंधारे पाण्याखाली

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर, दि. 24 : राधानगरी धरणात 236.46 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणाचा 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. राधानगरी धरणातून 2828, कोयनेतून 2100 तर अलमट्टी धरणातून 117922 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व पाटगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे व सरकारी कोगे, कुंभी नदीवरील- सांगरूळ, कासारी नदीवरील- पुनाळ-तिरपण,  ठाणे आवळे व यवलूज, वारणा नदीवरील-चिंचोली, कोडोली व शिगांव, वेदगंगा नदीवरील- वाघापूर, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, दत्तवाड व सुळकूड, असे एकूण 22 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 95.33 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 114.570 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 94.58 दलघमी, वारणा 915.41 दलघमी, दूधगंगा 698.45 दलघमी, कासारी 75.43 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 73 दलघमी, पाटगाव 105.24 दलघमी, चिकोत्रा 42.24 दलघमी, चित्री 53.410 दलघमी, जंगमहट्टी 34.650 दलघमी, घटप्रभा  44.170  दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल पा) 6.060 दलघमी असा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 32.2 फूट, सुर्वे 31.6 फूट, रुई 62.7 फूट, इचलकरंजी 59 फूट, तेरवाड 54.6 फूट, शिरोळ 51 फूट, नृसिंहवाडी 51.9 फूट, राजापूर 39.9 फूट तर नजीकच्या सांगली 23.9  फूट व अंकली 27 फूट अशी आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->