मुंबई, दि. 23 : मुंबई शहर आणि उपनगरासह लगतच्या परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने मुंबईला पाणी पुरवठा करत असलेले तलाव ब-यापैकी भरले आहेत. आजच्या घडीला या सातही तलावांत एकूण ९३.७४ टक्के एवढा जलसाठा आहे. यामध्ये तुळशी, विहार, मोडक सागर आणि तानसा हे चार तलाव तर केव्हाच ओव्हर फ्लो झाले आहेत. आता केवळ तीन तलाव भरणे शिल्लक असून, यात अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसाचा समावेश आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लीटर आहे. जलाशयांतील पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ झाल्याने, महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या लागू असलेली २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. म्हणजे आता १० टक्के इतकीच पाणीकपात लागू राहणार आहे.

No comments:
Post a Comment