उस्मानाबाद : उस्मानाबादची सारिका काळे ही अर्जुन पुरस्कार मिळवणारी मराठवाड्यातील बहुधा ही पहिलीच महिला क्रीडापटू आहे. पाच लाख रुपये आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आपण केलेल्या प्रामाणिक सहकार्यातून आणि पाठिंब्यामुळेच सारिका यांना उत्तुंग झेप घेण्यात मदत मिळाली याचा सार्थ अभिमान आहे.
मराठवाडा विभागातील उस्मानाबाद तालुक्यातील रुईभर या छोट्याशा गावातील एक सामान्य आणि अत्यंत गरीब घरातील सारिका सुधाकर काळे हिने खो-खो स्पर्धेत भारताचे नेतृत्व करुन उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचविले आहे. सारिकाने पदवीचे शिक्षण आपल्या तेरणा महाविद्यालय उस्मानाबाद येथे पूर्ण केले आहे.
ही गुणवान खेळाडू आपल्या तेरणा परिवारातील घटक असल्याचा आपल्याला अभिमान तर आहेच परंतु तिच्या भविष्यातील वाढचालीसाठी शासकीय नोकरीत रुजू होईपर्यंत २०१६ पासून तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रती महिना रु.१०,००० मानधन देण्यात आले आहे. त्यातूनच आज ती तुळजापूर येथे तालुका क्रीडा अधिकारी पदावर कार्यरत आहे ही बाब खरोखरच समाधानकारक आहे.

No comments:
Post a Comment