कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, August 21, 2020

कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह


कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेसचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोना चाचणी अहवाल गुरुवारी रात्री उशिरा पॉजिटीव्ह आला आहे. आ. पाटील यांनी स्वत: ट्वीट वरुन ही माहिती दिली आहे. 


ऋतुराज पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले आहे.

.. 

'माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापुरात उपचार सुरु आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती.' असे ट्वीट ऋतुराज पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->