सांगली : राजू शेट्टी हे सरड्याप्रमाणे रंग बदलतात अशी सणसणीत टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करताना भंपक आणि फालतू माणसासोबत पुन्हा काम करणार नाही असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रतिक्रिया दिली.
‘आमच्यासारख्या फालतू माणसांमुळेच तुमची संघटना मोठी झाली. आमच्यासारख्या माणसांमुळेच तुम्ही आमदार, खासदार झालात हे विसरलात काय. मला तुमच्यासारखं सरड्यासारखे रंग बदलता येत नाही,’ असा टोला सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना लगावला आहे.

No comments:
Post a Comment