रेडा : ग्रामसेवकाचे मनमानी कारभार, ग्रामस्थ ञस्त - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, August 27, 2020

रेडा : ग्रामसेवकाचे मनमानी कारभार, ग्रामस्थ ञस्त

 


रेडा (इंदापूर), दि. २७ : कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळात बफरझोन घोषित रेडा गावातील ग्रामसेवक च्या लपंडावामुळे बेफिकीर ग्रामस्थांना व गावाला वाली कोन? 

          

मौजे रेडा ( ता इंदापुर  ) हे गाव बफरझोन म्हणून घोषित केले आहे. या गावाशेजारील गावे सध्या कोरोणा विषाणू बाधीत रूग्ण सापडले आहेत त्यामुळे कोरोना विषाणू गंभीर साथी संक्रमण काळात गावातील ग्रामसेवक हा गेल्या ४ ऑगस्ट पासून गावात सात-आठ दिवसातून एकदा दिवस येऊन किमान एक ते दोन तास कार्यलयात थांबून निघून जातात यामुळे गावात ग्रामसेवक येतात की नाही हेच ग्रामस्थांना समजत नाही 

        

   रेडा गावाशेजारील रेडणी, काटी, लाखेवाडी  निरवांगी, सह आदी गावात सध्या कोरोणा विषाणू ने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर बारामती प्रांतधिकारी यांनी कोरोना विषाणू बाधीत गावापासून पाच कि मी अंतरावरील संपुर्ण गावे बफर झोन जाहीर करून या गावामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात आपत्तीकालीन साथी आजार कक्ष निर्माण करणे, गावच्या वेशीवर चेक पोष्ट तयार करणे, गावात गाव समिती मार्फत बैठका घेऊन कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे अशी अनेक कामे असताना गावचा मुख्य प्रमूख घटक ग्रामसेवकच गावात हजर नसल्यामुळे गावातील सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणारे लोक, सुरक्षित अंतर न ठेवणारे, गावात सार्वजनिक ठिकाणी विनामास्क बसून इतरञ फिरणारे, मंदिर परिसरात बाहेर गावाहून आलेले मुले क्रिकेट खेळणे, तर गावात जिल्हा परिषद शाळेच्या आवारात जुगार खेळणारे यांच्यावर प्रतिबंध होत नाही. 

          

 यामुळेच गावातील ग्रामस्थ बेफिकीर राहतात यातच काल परवा दि २२ ऑगस्ट रोजी विद्यमान ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, व ग्रामपंचायत सदस्य यांचा कार्याकाल संपल्यामुळे गावाला प्रशासक म्हणून शिक्षणविस्तार आधिकारी यांची नेमणूक झाली आहे. गावातील ग्रामस्थ दाखले, उतारे,व इतर कामासाठी आल्यास त्यांनी ग्रामसेवक यांना फोन करून विचारना केली असता माझी बदली झाली आहे तुम्ही नविन ग्रामसेवक आल्यावर त्याच्याकडून काम करू घ्या असे सांगितले जात आहे .

             

 त्यामुळे रेडा गावाला ना ग्रामसेवक, ना राजकीय समिती ,ना प्रशासक म्हणजे कोनीच वाली नाही अशी अवस्था गावची झाली आहे या बाबत पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती इंदापुर यांनी लवकरच दखल घेऊन रेडा गावाला कायमस्वरूपी ग्रामसेवक द्यावा अशी सुज्ञ नागरीकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->