रेडा, (इंदापूर) : जो पर्यंत दूधाला दरवाढ मिळत नाही तो पर्यंत गावात येणा-या मंञ्याला दूधाने अंघोळ घालणार असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र व राज्य शासनाला बारामती येथे दूध आंदोलनात दिला.
२७ ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथे दूध दरवाढीसाठी व इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी बारामतीत आज मोर्चा काढला यावेळी त्यांनी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या धोरणावर ती सडेतोड टीका केली.
माजी खासदार राजू शेट्टी पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री यांनी बंगल्याबाहेर पढाव व महाराष्ट्रात काय चाललेला आहे हे पहावं अलिबाबा आणि चाळीस चोर कशा पद्धतीने चोरी करत आहे हे पाहव असाही गंभीर आरोप राजेश शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकार वरती केलेला आहे. नेमक्या राजू शेट्टी यांच्या मागण्या काय होत्या आणि केंद्र सरकार व राज्य सरकारवर त्यांनी काय टीका केलेले आहे यासंदर्भात आमचा प्रतिनिधी संतोष भोसले यांनी त्यांच्याशी केलेली चर्चा.
काही मुद्दे...
*सर्वपक्षीय नेते कागदी मेळ बसवून सरकारी तिजोरी लूटत आहेत..
* पवारांबद्दल चा स्नेह अजूनही आहेच मात्र माझा शेतकऱ्यांचा स्नेह सुटणार नाही,ज्यावेळी शेतकऱ्यांचा प्रश्न पुढे येईल त्यावेळेस मी रस्त्यावर आहेच..
* सहकाराच्या नावाखाली सरळ सर्व दरोडा टाकला जात आहे सरकारी तिजोरीतील पैसे दूध उत्पादक पर्यंत पोहोचत नाही त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंगल्याच्या बाहेर निघावं व महाराष्ट्रात काय चाललेला आहे हे बघावं असा सल्ला शेट्टी यांनी दिला आहे..
*दुधाचा पैसा चोरांच्या घरात न जाता दूध उत्पादकांकडे जावा..
* शरद पवारांनी यात वडीलकीच्या नात्याने मध्यस्थी करून तोडगा काढावा अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे... या मागण्या न झाल्यास पुढील आंदोलन वेगळ्या पध्दतीने केले जाईल असे शेवटी शेट्टी म्हणाले.
मुख्यमंत्री जरा डोळे उघडा...मातोश्रीच्या बाहेर पडा, आणि महाराष्ट्रात काय चालले आहे बघा...अलिबाबा आणि चाळीस चोर कशा पद्धतीने चोरी करीत आहेत ते बघा....यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस असे सर्वच पक्ष सहभागी आहेत, तुम्ही आम्ही मावसभाऊ दोघे मिळून वाटून खाऊ....असे सुरु आहे, अशा शब्दात माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीका केली.


No comments:
Post a Comment