नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर सुनावणी झाली. यावेळी कपिल सिब्बल व मुकूल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय दिलेला आहे. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी दि. 28 ऑगस्टला होणार असल्याचे म्हटले आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून ती अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे, महाराष्ट्राचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. मात्र या सुनावणीला आता 28 ऑगस्टची तारीख देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने मुकूंद रोहतगी हे बाजू मांडत आहेत. आज झालेल्या सुनावणीत इंद्रा सहानी प्रकरणाचा दाखला देत मराठा आरक्षण प्रकरणावर चर्चा करण्यासाठी मोठं खंडपीठ हवे, असे रोहतगी यांनी म्हटले आहे.

No comments:
Post a Comment