केशवकुमार अर्थात प्रल्हाद केशव अत्रे हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व. साहित्य, शिक्षण तज्ञ, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवत प्रत्येक क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवल. या सर्वच क्षेत्रामध्ये त्यांच कार्य अतुलनिय आहे. फर्डे वक्ते असलेले अञे म्हणजे जणू तोफच होते. आपल्या वक्तृत्वाने ते श्रोत्यांना भारावून टाकत असत तर विरोधकांना घायाळ करत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. काही काळ ते महाराष्ट्र विधानसभेत आमदारही होते.
मराठी नाट्यक्षेञाच्या इतिहासात आचार्य अत्रे यांना विशेष स्थान आहे. विनोदप्रधान नाटकांची नवी परंपरा त्यांनी घडवली. `साष्टांग नमस्कार` ,मोरुची मावशी` `लग्नाची बेडी` , भ्रमाचा भोपळा` ही त्यांनी लिहिलेली नाटकं सदाबहार ठरली आहेत. निखळ विनोद हे या नाटकांचं वैशिष्टय. तो मी नव्हेच` हे त्यांचं उत्कंठाप्रधान नाटकही फार गाजले.
अत्रे यांची चित्रपट कारकीर्दही मोठी आहे. अञेंच्या पहिला चिञपट श्यामची आई, या चिञपटास राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मास्टर विनायक यांनी दिग्दर्शित केलेल्या ब्रम्हचारी` `ब्रॅन्डीची बाटली` या चित्रपटांच्या कथा पटकथा त्यांनी लिहिल्या. याशिवाय महात्मा फुले यांच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली. अत्र्यांच्या बहुतांशी चित्रपटांमध्ये विनोद आणि सामाजिक आशय यांचं चपखल मिश्रण आढळून येते. आचार्य अञेचे संवाद लेखन (डाँयलाग) अजरामर होते.
आचार्य अत्र्यांचं लेखणीइतकंच वाणीवरही जबरदस्त प्रभूत्व होतं. त्यांची भाषणं म्हणजे श्रोत्यांकरिता मेजवानीचं असें. म्हणूनच त्यांच्या सभांना विक्रमी गर्दी होत असे. भाषण करताना उभे राहण्याची त्यांची ढब, हावभाव व वक्तृत्वशैली यांचा प्रभाव इतका होता की, इतर अनेक वक्त्यांनी त्यांचं अनुकरण केलं. अत्र्यांच्या वाणीतून आणि लेखणीतून त्यांचं चतुरस्त्र व्यक्तिमत्व प्रकट होत असे. शंकरराव देव, एस.एम. जोशी, बाळासाहेब ठाकरे, ना.सी.फडके, श्री.म. माटे, मामा वरेकर अशा अनेकांबरोबर त्यांनी घातलेले वादही खूप गाजले.
अत्रेंनी राजकारणातही मोठं यश मिळवलं. महाराष्ट्र विधानसभेचं आमदारपद, पुणे शहराचं नगरसेवकपद काही काळ त्यांनी भूषविले मराठी जनमानसावर त्यांचा प्रभाव दीर्घकाळ टिकून आहे.
अञेच्या मनात शिवाजी महाराज, महात्मा फुले व डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल पराकोटीचे ममत्व होते. बाबासाहेबांच्या शिवाजी पार्क येथील अंत्यविधीवेळी शोकसभेत फक्त अञेंनी शोकपर भाषणं केले. त्याबद्दल 'हुंदके'मध्ये सविस्तर लिहले आहे. मुळ काँग्रेसचे असलेले अञे संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान काँग्रेस विरोधी झाले. सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी आचार्य अञेंनीच दिली तर सावरकरांनी अञेंचा आचार्य असा उल्लेख पहिल्यांदा केला. अञे शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शिवप्रभू' असा करत. शिक्षणापासून वंचित असलेल्या विपूल व दर्जेदार साहित्य लिहलेल्या व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अञेंचे सहकारी आण्णाभाऊ साठेंच्या पुस्तकाचे प्रकाशन अञेंच्या हस्ते झाले होते.
अञे हे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र लढ्याला वेगळेच यश प्राप्त (अञेंची ही भाषणं पुस्तकरूपी "वाघनखं") झाले. झेंडूची फुले हे विडंबन काव्य संग्रह वाचकाना हसवतो, अंतर्मुख करतो. अञ्यांचा "प्रेमाचा गुलकंद" तर आजही ताजातवाना आहेच. "हुंदके" अञेंच्या संवेदनशीलतचे दर्शन घडवते. एक व्यक्ती आनेक क्षेत्रात एवढं उत्तुंग यश मिळवते याचे एकमेव उदाहरण
"हशा आणि टाळ्या" हे समिकरण निर्माण करणाऱ्या या महामानवास जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

No comments:
Post a Comment