नागपूर : नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंढे यांनी स्वत: ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
मुंढे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून माझ्यात कोणतीही लक्षणे नाहीत, पण नियमानुसार मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. मागील 14 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांना मी विनंती करतो की, त्यांनी देखील चाचणी करुन घ्यावी. नागपूरमधील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी मी घरातूनच काम करत आहे. आपण नक्कीच जिंकू, असे तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

No comments:
Post a Comment