अनलॉक-४ ची नियमावली जाहीर; राज्यात ई-पासची अट रद्द - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 31, 2020

अनलॉक-४ ची नियमावली जाहीर; राज्यात ई-पासची अट रद्द



मुंबई : संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली असून राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत. त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे.


काय बंद राहणार?


- शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था आणि क्लासेस बंदच राहणार आहेत. ऑनलाीन, डिस्टन्स लर्निंग सुरु राहणार आहे. 

- सिनेमा ह़ॉल, स्विमिंग पूल, पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम आदी स्थळे बंदच राहणार आहेत. 

- एमएचएने परवानगी दिल्याशिवाय आंतरराष्ट्रीय विमान प्रवास बंदी. 

- मेट्रो सेवा बंदच राहणार आहे. 

- सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, सांस्कृतीक कार्यक्रम बंद राहणार आहेत. 


काय सुरु राहणार… 


- सामान्य दुकाने, दारुची दुकाने सुरु राहणार आहेत. 

- हॉटेल, लॉज 100 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

- सरकारी कार्यालये त्यांना दिलेल्या क्षमतेनुसार सुरु ठेवायची आहेत..

- खासगी कार्यालयांमध्ये 30 टक्के कर्मचारी उपस्थितीला परवानगी आहे, 

- आंतरजिल्हा प्रवासासाठी आता परवानगी देण्यात आली असून कोणत्याही ई पासची गरज लागणार नाही. 

- खासगी बस, मिनी बस आदींच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. 

- टॅक्सी – 1+3 प्रवासी, रिक्षा – 1+2 प्रवासी, चारचाकी- 1+3 प्रवासी, दुचाकी- 1+1 हेल्मेट आणि मास्क परवानगी...


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->