अभिनेत्री दिपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने जीवनाश्यक वस्तूचे वाटप - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, August 27, 2020

अभिनेत्री दिपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने जीवनाश्यक वस्तूचे वाटप



रेडा (इंदापूर), दि. २६ : कोविड १९ गंभीर साथी संक्रमण काळात सामाजिक बांधिलकी म्हणून सिनेआभिनेञी दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून दररोज हातावरी पोट असणा-या रिक्षा चालकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप अभिनेञी दिपाली भोसले सय्यद यांनी दि. २६ ऑगस्ट रोजी पुणे येथून केले. 


सिनेआभिनेञी दिपाली भोसले सय्यद या जीवनावश्यक वस्तू वाटप करताना म्हणाल्या कि, दैनंदिन जीवनात काम करित असताना आपण समाज्याचे काहीतरी देने लागतो तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळात लोकांचे आर्थिक परिस्थिती खलावली आहे त्यामुळे संकटाच्या काळात लोकांना केलेली मदत एक प्रकारे पुण्यच लाभते अशी प्रतिक्रिया भोसले सय्यद यांनी दिली. 


यावेळी सिनेआभिनेञी दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट चे  आयोजक विश्वस्त भाऊसाहेब शिंदे सह आदि स्वयंसवक उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->