औरंगाबाद / पुणे : महाआघाडी सरकारच्या विरोधात औरंगाबाद व पुणे ठिकाणी आज रविवार (दि. 9) रोजी दोन वेगवेगळया दोन वेगवेगळ्या संघटनाकडून जागरण गोंधळ घालत आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी गांभीर्य नसलेल्या सरकार विरोधात शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली खाली 13 मराठा संघटना मिळून आज पुण्यात आंदोलन करत आहेत.
जागरण गोंधळ आणि काळे कपडे घालून या अंदोलनात सर्व मराठा बांधव उतरणार असून दुसरीकडे नाभिक समाजाकडून राज्य सरकारने केलेल्या जाचक अटींच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंधळ घालण्यात आला आहे.
तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी 42 बांधवांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. मात्र बलिदान दिलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या मागणीकडे सरकार हे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत जागरण गोंधळाच्या माध्यमातून राज्य सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा प्रयत्न करत आहे. बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना मदत द्यावी, अन्यथा पुन्हा मराठा क्रांती ठोक मोर्चा पेटून उठेल असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या वतीने देण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment