रायगड जिल्ह्यात 15 हजार 335 जणांनी केली करोनावर मात - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, August 12, 2020

रायगड जिल्ह्यात 15 हजार 335 जणांनी केली करोनावर मात

 

अलिबाग, जि. रायगड : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 15 हजार 335 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 376 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1611, पनवेल ग्रामीण-341, उरण-140, खालापूर-213, कर्जत-72, पेण-268, अलिबाग-234, मुरुड-22, माणगाव-84, तळा-10, रोहा-255, सुधागड-33, श्रीवर्धन-15, म्हसळा-14, महाड-117, पोलादपूर-10 अशी एकूण 3 हजार 439 झाली आहे.

     

कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-6 हजार 619,  पनवेल ग्रामीण - 2 हजार 101, उरण-845, खालापूर-1 हजार 012, कर्जत-520, पेण-1 हजार 233, अलिबाग-1 हजार 047, मुरुड-141, माणगाव-341, तळा-21, रोहा-562, सुधागड-40, श्रीवर्धन-143, म्हसळा-189, महाड-444,  पोलादपूर-77 अशी एकूण 15 हजार 335 आहे.            

       

आज दिवसभरातही पनवेल मनपा-131, पनवेल ग्रामीण-42, उरण-17, खालापूर-27, कर्जत-8, पेण-7, अलिबाग-21, मुरुड-6,  माणगाव-3, रोहा-24,  म्हसळा-2,  महाड-3 असे  एकूण 291 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

       

आतापर्यंत पनवेल मनपा-197, पनवेल ग्रामीण-52, उरण-40, खालापूर-42, कर्जत-19, पेण-43, अलिबाग-36, मुरुड-13, माणगाव-4, तळा-2, रोहा-18, सुधागाड-2, श्रीवर्धन-9, म्हसळा-7, महाड-30, पोलादपूर-10 असे एकूण 524 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.

         

आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-179, पनवेल (ग्रा)-26, उरण-25, खालापूर-20, कर्जत-8, पेण-33, अलिबाग-41, मुरुड-2, माणगाव-9,  रोहा-12, सुधागड-7, श्रीवर्धन-1, म्हसळा-2, महाड-8, पोलादपूर-3  अशा प्रकारे एकूण 376 ने वाढ झाली आहे.

     

गेल्या चोवीस तासात 8 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-4, पनवेल (ग्रामीण)-1,  खालापूर-1, महाड-1, पोलादपूर-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.

      

आतापर्यंत जिल्ह्यातून 64 हजार 714 नागरिकांचे SWAB  तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 269 आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->