कोविड-19 साठी रॅपिड अँटीबॉडी टेस्ट व रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी शासनाने निश्चित केले शुल्क आकारणी दर - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 11, 2020

कोविड-19 साठी रॅपिड अँटीबॉडी टेस्ट व रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी शासनाने निश्चित केले शुल्क आकारणी दर


रायगड, दि.11 : खाजगी प्रयोगशाळा आणि कोविड-19 साठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता प्रदान केलेल्या उत्पादकांच्या रॅपिड अँटीबॉडी टेस्ट व रॅपिड अँटीजेन टेस्ट वापरणे बंधनकारक आहे.     


महाराष्ट्र राज्यात साथरोग नियंत्रण कायदा 1897 अंतर्गत सक्षम अधिकाऱ्याच्या निर्देशानुसार या तपासण्यांचे कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत. राज्यातील कोणत्याही खाजगी प्रयोगशाळेला या दरापेक्षा अधिक दर आकारण्यात येणार नाहीत, असे आदेश शासनाने दिले आहेत.

तपासणीचा प्रकार व सर्व करांसहित आकारण्यात येणारे शुल्क :-

 

ELISA अँटीबॉडी टेस्ट :- रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास रु. 450/-, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास रु.500/-, रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास रु.600/- 

CLIA अँटीबॉडी टेस्ट :- रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास रु. 500/-, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास रु.600/-, रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास रु.700/- 

रॅपिड अँटीबॉडी टेस्ट :- रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास रु. 600/-, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास रु.700/-, रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास रु.800/-

       

शासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य सोसायटी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेने शिफारस केलेल्या विविध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या रॅपिड अँटीबॉडी चाचण्यांच्या वापराबाबत शिफारस करणे तसेच शिफारस केलेल्या चाचण्यांच्या अनुषंगाने प्रसिद्ध करावयाच्या अभिव्यक्ती स्वारस्याचा मसुदा तयार करणे, या चाचण्या कशा प्रकारे कराव्यात याची शिफारस करणे इत्यादी बाबी निश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने आयसीएमआर च्या मान्यताप्राप्त उत्पादकांच्या ELISA,CLIA या रॅपिड अँटीबॉडी डिटेक्शन टेस्ट व रॅपिड अँटीजन टेस्ट यांची अचूकता, उपलब्धता, तपासणी साठी लागणारा कालावधी या निकषांवर गुणवत्ता ठरवून त्यांचा कोणकोणत्या स्तरावर कोणत्या तपासणीचा वापर करावा, याबाबतचा तांत्रिक अहवाल शिफारशींसह शासनास सादर केला. शासनाने हा अहवाल स्वीकृत केला व त्यानुसार चाचण्यांचे कमाल दर निश्चित केले.  


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->