लोकसभेच्या 17 खासदारांना कोरोनाची लागण - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, September 14, 2020

लोकसभेच्या 17 खासदारांना कोरोनाची लागण

 


नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. त्यातच आता लोकसभेच्या 17 खासदारांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी पाच खासदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. 


आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना कोरोना चाचणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये लोकसभेतील 17 खासदारांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.



कोरोनाची लागण झालेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक भाजपाचे खासदार आहेत. यामध्ये भाजपच्या 12 खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तर शिवसेनेच्याही एका खासदाराचा यामध्ये समावेश आहे. वायएसआर काँग्रेसच्या 2, डीएमके आणि आरएलपी पक्षाच्या प्रत्येकी एक खासदारास कोरोनाची बाधा झाली आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->