मुंबई, दि. 2 : काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश करावा, असा सल्ला रिपाइं पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
रामदास आठवले म्हणाले कि, भाजप पुढील अनेक वर्षे सत्तेत असणार आहे. कपिल सिब्बल व गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेसच्या अन्य दिग्गज नेत्यांवर भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे त्या नेत्यांनीही ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखे राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील झाले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कॉंग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलेले पत्र चर्चेचा आणि पक्षांतर्गत मतभेदांचा विषय बनले आहे. पक्षात संघटनात्मक पातळीवर तातडीने सुधारणा करतानाच पूर्णवेळ अध्यक्ष निवडावा, अशी मागणी त्या पत्रातून करण्यात आली. त्या पत्रावरून कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत आणि बाहेरही मोठे घमासान झाले.

No comments:
Post a Comment