नीट-जेईई परीक्षा होणारच; सहा राज्यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, September 4, 2020

नीट-जेईई परीक्षा होणारच; सहा राज्यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

 


नवी दिल्ली : नीट-जेईई परीक्षा पुढे ढकलण्यासाठी सहा राज्यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याअगोदरच सर्वोच्च न्यायालयाने नीट आणि जेईई (मेन) परीक्षा आयोजनासाठी मान्यता दिली होती. न्यायालयाच्या या आदेशावर सहा राज्यांच्या मंत्र्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळत नीट आणि जेईई (मेन)च्या परीक्षांना हिरवा कंदील दिला आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->