राज्य सरकारने पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय म्हणजे मूर्खपणा - खासदार छत्रपती संभाजीराजेंची टीका - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, September 17, 2020

राज्य सरकारने पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय म्हणजे मूर्खपणा - खासदार छत्रपती संभाजीराजेंची टीका

 


नवी दिल्ली, दि. 17 : राज्य सरकारने पोलीस भरतीबात मोठा निर्णय घेता असून राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास 12,538 पदांची भरती होणार आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर खासदार छत्रपती संभाजीराजेंनी जोरदार टीका केली आहे. 


महाविकास आघाडीने 12 हजार 500 जागांच्या पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा असल्याचं छत्रपती संभाजीराजेंनी म्हटले असून मराठा आरक्षणाची सध्या लढाई सुरू आहे आणि यात राज्यात कोरोनाचा प्रकोप आहे. अशावेळी पोलीस भरती करणे कितपत योग्य आहे असा सवाल छत्रपती संभाजी राजे यांनी उपस्थित केला आहे.


राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाज पेटून उठणार आहे. मराठा आरक्षणाची लढाई सुरू आहे त्यासोबतच राज्यावर कोरोनाचा प्रकोप आहे. अशावेळी पोलीस भरती करणं कितपत योग्य आहे?, असा सवालही छत्रपती संभाजीराजेंनी केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->