औंरगाबाद, दि. 2 : काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील (वय 91 वर्षे) यांचे बुधवार दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी साडे सहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बोर दहेगांव ता.वैजापूर येथे आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात आप्पासाहेब, काकासाहेब ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
रामकृष्ण पाटील यांचा पंचायत समितीचे सभापती ते खासदार असा राजकीय प्रवासप्रवास होता. औरंगाबाद जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील 'बाबा माणूस' ही त्यांची ओळख होती. 1970 साली सरपंच पदापासून त्यांनी आपल्या आपल्या राजकारणाची सुरुवात केली. रामकृष्ण बाबा यांनी 1985 साली वैजापूर तालुक्याचे आमदार पद भूषविले. हे पद 1995 पर्यंत त्यांनी कायम ठेवले. याशिवाय 1998 - 99 साली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली व ते 12 व्या लोकसभेचे खासदार झाले. रामकृष्ण बाबांनी पंचायत समितीचे सभापती भूषविले. 25 वर्ष जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट कॉ. ऑ.बँकेचे पाच वर्ष संचालक म्हणूनही बाबांनी काम केले.

No comments:
Post a Comment