बालासोर, दि. 03 : एलएसीवर चीनबरोबर तणाव सुरु असतानाच भारताने ओडिशातील बालासोर येथे शनिवारी शौर्य या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अण्वस्त्र सज्ज असून हे क्षेपणास्त्र 800 किमी अंतरावरील लक्ष्य भेदू शकते. हे क्षेपणास्त्र सध्या अस्तित्वात असलेल्या क्षेपणास्त्र यंत्रणेला मजबूत करणारे आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे.
सध्या भारताकडे असलेल्या क्षेपणास्त्रांच्या तुलनेत वजनाला कमी आणि हाताळण्यासही हे क्षेपणास्त्र सोपे आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र लक्ष्याकडे झेपावताना अखेरच्या टप्प्यात हायपरसोनिक वेग प्राप्त करतो.
शौर्य क्षेपणास्त्राचे पहिले परीक्षण 2008 मध्ये ओडिशाच्या चांदीपूर येथे करण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबर 2011 मध्ये याचे दुसरे परीक्षण करण्यात आले होते. पूर्वी याची क्षमता 750 किमी इतकी होती.

No comments:
Post a Comment