बारा लाख खर्च करुनही रेडा गावातील ग्रामस्थ गावापासून दूरच - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, November 3, 2020

बारा लाख खर्च करुनही रेडा गावातील ग्रामस्थ गावापासून दूरच

रेडा, दि. 3 : इंदापूर तालुक्यातील रेडा गावात पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांनी विशेष बाब म्हणून रेडा गावात ओढ्यावर बारा लाख रुपये पुलासाठी मंजूर केले. दरवर्षी पावसाळ्यात ओढ्याला पाणी आले की गावातील शेतकरी यांना वाड्या वस्त्यावर जाणे येणे जिकिरीचे होत होते. गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्याकडे कैफियत मांडली. त्याप्रमाणे प्रविण माने यांनी विशेष बाब म्हणून बारा लाख रुपये पुलासाठी मंजूर केले. सदर पुलाचा ठेका निमगावकेतकी येथील कंपनीने घेतला. 


ठेकेदार यांनी आर्थिक नफ्याच्या आशेपोटी अंदाजपञकातील समाविष्ट केलेल्या वस्तूमधे कपात करून पुलाचे काम पुर्ण केले यावेळी गावतील सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य तत्कालीन उपसरपंच यांनी इंदापुर पंचायत समिती उप अभियंता आणि शाखाधिकारी तंमसुरे यांना निकृष्ठ कामाबाबत तक्रारी केल्या परंतू त्याकडे दुर्लक्ष केले. दि. १४, १५व १८ रोजी झालेल्या अतिवृष्टीत आलेल्या पुराच्या पाण्यात अर्धवट पूल वाहून गेला. 


सध्या पूल वाहून गेल्यामुळे रेडा शेटफळ हवेली रस्त्यावरील वाहातूक पुर्ण बंद आहे. सदर पुल दुरुस्तीसाठी इंदापुर पंचायत समिती मधे विचारणा केली असता बांधकाम उपविभाग म्हणाले कि यापुलाची देखभाल दुरूस्ती एक वर्ष ठेकेदाराकडे आहे लवकरात लवकर पञ देऊन कामासंबधीत ठेकेदार याला पुलावरील वाहून गेलेला मुरूम टाकून दुरूस्त केला जाईल असे सांगण्यात आले. 



फोटो ओळ : मौजे रेडा गावतील बारा लाख खर्च करुनही अतिवृष्टीत पूल वाहून गेला. (छाया: संतोष भोसले)  

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->