व्हॉट्सऍपवर 'मातृदिना'चे सेलिब्रेशन - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, May 9, 2021

व्हॉट्सऍपवर 'मातृदिना'चे सेलिब्रेशन


व्हॉट्सऍपवर 'मातृदिना'चे सेलिब्रेशन

मे महिन्याचा दुसरा रविवार हा जगभरात मातृ दिन (मदर्स डे) म्हणून साजरा केला जातो. 9 मे रोजी येणाऱया 'मदर्स डे'चे औचित्य साधून व्हॉट्सअॅपने युजर्सला खास गिफ्ट दिले आहे. व्हॉट्सअॅपने सुंदर स्टिकरचे पॅक लाँच केले आहे. या स्टिकर पॅकला 'ममा लव्ह' असे नाव देण्यात आले आहे. अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही युजर्ससाठी हे उपलब्ध आहे.

युजर्ससाठी 'ममा लव्ह' स्टिकरची खास भेट

'मदर्स डे'च्या स्टिकर पॅकमध्ये एकूण 11 स्टिकर असून ते ऑनिमेटेड आहेत. स्टिकर स्टोअरमधून ते डाऊनलोड करता येतील. त्यासाठी व्हॉट्सअॅपवर एक चॅट सुरू करायचे आणि ईमोजी बटणावर टॅप करायचे. त्यानंतर खालील ट्रेमधून स्टिकर आयकॉन निवडायचे आणि सिलेक्ट बटणावर टॅप करावे. त्यानंतर व्हॉट्सअॅप स्टिकर स्टोअरवर जाता येईल. तिथे 'ममा लव्ह' स्टिकर पॅक दिसेल.

याव्यतिरिक्त लवकरच व्हॉट्सअॅपवर स्टिकर सजेशन फीचर येणार आहे. नव्या अपडेटनुसार आपण जो शब्द टाईप करू त्यानुसार आपल्याला स्टिकर सुचवले जातील.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->