पुणे ,दि.११ :
यावर्षी तब्बल दहा दिवस आधीच मान्सूनला गती देणार्या चक्रीवादळाची निर्मिती हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एकाचवेळी सुरू झाली आहे.
10 मेपासून 120 तासांत म्हणजे सहा दिवसांत ते ओमानकडे सरकणार आहे. हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या हंगामातले पहिले सायक्लोन बुलेटिन सोमवारी प्रसिद्ध केले.
यंदा मान्सून लवकरच येणार असल्याची ही वर्दी असून, दरवर्षी 20 मेच्या सुमारास बंगालच्या उपसागरात अशी तयारी पाहावयास मिळते; मात्र यंदा दहा दिवस आधीच हिंद महासागरातील मालदीव बेटाजवळ, तसेच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार होण्यास सुरुवात झाली आहे.
No comments:
Post a Comment