कोरोना प्रतिबंधक लसीच्या वितरणासंदर्भात बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 11, 2020

कोरोना प्रतिबंधक लसीच्या वितरणासंदर्भात बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक


नवी दिल्ली : निती आयोगाचे डॉ. व्ही.के. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. 12 ऑगस्ट रोजी कोरोना प्रतिबंधक लसीच्या खरेदी, प्राधान्यक्रम व वितरण संदर्भात तज्ज्ञ समितीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. 


केंद्र सरकारने लस खरेदी, प्राधान्यक्रम आणि वितरण या संबंधी निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. लस हाच कोरोना व्हायरसच्या संकटातून मुक्ती मिळवण्याचा सध्याच्या घडीला एकमेव मार्ग आहे. जगातील तीन ते चार लसी मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचल्या असून सर्व काही सुरळीत झाले तर सप्टेंबरपासून लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते.


त्या पार्श्वभूमीवर बुधवारी टास्क फोर्सची आपल्याकडे लसीकरण कसे करायचे व त्याचा आराखडा निश्चित करण्यासंदर्भात ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. देशातील २२ लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत ४४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकार आणि लस उत्पादकांबरोबरही ही समिती चर्चा करेल असे आरोग्य मंत्रालयाने सांगितल्याचे वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->