![]() |
| संग्रहित छायाचित्र |
कोल्हापूर, दि. 22 : आज दुपारी 4 वा. च्या अहवालानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 34 बंधारे पाण्याखाली आहेत.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- शिरगांव, राशिवडे, हळदी, खडक कोगे,सरकारी कोगे तुळशी नदीवरील बीड, कुंभी नदीवरील- सांगरूळ, कळे, कासारी नदीवरील- पुनाळतिरपण, ठाणे आळवे, यवलूज वारणा नदीवरील-चिंचोली, माणगांव, कोडोली, खोची, मांगले सावर्डे, शिगांव, चावरे, दानोळी, वेदगंगा नदीवरील- वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे, चिखली, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, दत्तवाड,सुळकुडअसे एकूण 34 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणसाठा
आज दुपारी 4 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे 4 व 5 क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. आज दुपारी 4 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 4256 तर दूधगंगा धरणातून 3800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील धरणांचा पाणी पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 233.182 दलघमी, तुळशी 95.087 दलघमी, वारणा 911.62 दलघमी, दूधगंगा 689.354 दलघमी, कासारी 72.85 दलघमी, कुंभी 72.30 दलघमी, पाटगाव 105.24 असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 35.7 फूट, तेरवाड 57 फूट, शिरोळ 55 फूट, नृसिंहवाडी 54.6 फूट अशी आहे.

No comments:
Post a Comment