औरंगाबाद : औरंगाबाद शहर स्मार्ट शहरांच्या यादीत मोडते. परंतु, शहरातील रस्त्यावर पावसामुळे खड्डेच खड्डे पडले आहे. या खड्ड्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. या खड्ड्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन पुकारले होते. जे नागरिक रस्त्यावरील खड्डे चुकवत येत होते, या नागरिकांना मानेचा पट्टा, कमरेचे पट्टे बक्षिस स्वरूपात मनसेकडून देण्यात येत होते.
शहरातील अर्बन बाजार ते मृत्युंजय चौक रस्त्यावर खड्डे पडले आहे. या खड्ड्यांचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे, मनसे खड्ड्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे.मनपा प्रशासनाचा विरोध करत खड्डे चूकवा बक्षिस मिळवा अशी स्पर्धा मनसेने आयोजित केली होती.

No comments:
Post a Comment