बीड : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढणारी रूग्णसंख्या प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. यामुळे बीडमध्येही कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये १० दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. रुग्णवाढीचा दर कमी करण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी आणि केज ही शहरांत १२ ऑगस्टपासून २१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माहिती दिली आहे.

No comments:
Post a Comment