मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिद्धिविनायक मंदिराच्या ॲपचे उद्घाटन - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, August 28, 2020

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिद्धिविनायक मंदिराच्या ॲपचे उद्घाटन

 


मुंबई, दि.28 : सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या ‘सिद्धिविनायक टेंपल’ या मोबाईल ॲपचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपद्वारे भाविकांना घरबसल्या बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे.


या कार्यक्रमाला सिद्धिविनायक गणपती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त भरत पारीख, महेश मुदलियार, आनंद राव, गोपाळ दळवी, संजय सावंत, विशाखा राऊत, ॲड. पंकज गोरे, सुबोध आचार्य, वैभवी चव्हाण, न्यासाच्या कार्यकारी अधिकारी प्रियंका छापवाले आदी मान्यवर उपस्थित होते.


कोरोना काळात मंदिरे बंद असल्याने भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येत नव्हते. भाविकांच्या सोयीसाठी न्यासातर्फे ही विशेष सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ‘सिद्धिविनायक टेंपल’ या नावाने असणारे हे ॲप अँड्रॉईड आणि ॲपलवरुन डाऊनलोड करता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून भाविकांना ऑनलाईन दर्शनाची वेळ बुक करता येणार आहे. या बुक केलेल्या वेळी भाविकांच्या नावे मंदिराचे पुजारी थेट गाभाऱ्यातून आशीर्वचन करतील. तसेच ॲपद्वारे भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार असून मंदिरातील विविध सण- उत्सवांची अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->