सीएसकेचा फलंदाज सुरेश रैना आयपीएल २०२० मधून बाहेर - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 29, 2020

सीएसकेचा फलंदाज सुरेश रैना आयपीएल २०२० मधून बाहेर

 


युएईमध्ये आयपीएलच्या 13 व्या मोसमाला दि. 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर जबरदस्त धक्का बसला आहे. कारण त्यांच्या संघाचा फलंदाज सुरेश रैना याने आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. सुरेश रैनानं कौटुंबिक कारणास्तव भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि तो यंदाची आयपीएल खेळणार नाही. याबद्दल सीएसकेने ट्विटर द्वारे माहिती दिली आहे.


चेन्नई सुपर किंग्सचे सीइओ केएस विश्वनाथन यांनी सांगितले की, सुरेश रैना वैयक्तिक कारणामुळे भारतात परतला असून तो या आयपीएल हंगामासाठी उपलब्ध नसेल. चेन्नई सुपर किंग्स सुरेश रैनाला आणि त्याच्या कुटुंबाला या वेळेत पूर्ण पाठिंबा देईल.


सुरेश रैना 2008 पासून प्रत्येक आयपीएल हंगामात आत्तापर्यंत खेळला आहे. त्यामुळे हा त्याच्या पहिलाच असा हंगाम असेल ज्यात तो खेळणार नाही. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचाही खेळाडू आहे. त्याने आत्तापर्यंत आयपएलमध्ये 193 सामन्यात खेळताना 33.34 च्या सरासरीने 5368 धावा केल्या आहेत.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->