मुंबई, दि. 29 : राज्यातील मंदिरं उघडी सुरु करण्याच्या मागणीसाठी आज राज्यभर भारतीय जनता पार्टीच्या घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील मंदिर लवकरात लवकर सुरू झाली पाहिजेत, यासाठी भाजपने आंदोलनाची हाक पुकारली आहे. डोंबिवलीचं ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिर संस्थानाच्या बाहेर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गणपतीची आरती करुन पावसात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाची सुरूवात केली. माजी राज्यमंत्री आणि भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच धार्मिकस्थळे सुद्धा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र त्यानंतर अनेक व्यवसाय, दुकाने, वाहने सर्वच सुरू झाली. मात्र राज्यातील देवस्थानं बंद का ? असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. राज्य सरकार दारुची दुकाने उघडी करू शकते मात्र लाखों भाविकांची श्रद्धा, आराधना असलेल्या मंदिराला ठाकरे सरकार का उघडू शकत नाही असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. राज्यभरात आज ठाकरे सरकार विरोधात भाजप हे आंदोलन करत आहे.

No comments:
Post a Comment