कोल्हापूर : राधानगरीतून 1200; तर अलमट्टीतून 37861 क्युसेक विसर्ग सुरू - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 29, 2020

कोल्हापूर : राधानगरीतून 1200; तर अलमट्टीतून 37861 क्युसेक विसर्ग सुरू

 

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर, दि. 29 :  राधानगरी धरणात 229.57 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 तर अलमट्टी धरणातून 37861 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व पाटगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.


पंचगंगा नदीवरील- राजाराम, रूई व इचलकरंजी, असे एकूण 3 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 99.11 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.


जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 97.15 दलघमी, वारणा 934.45 दलघमी, दूधगंगा 708.27 दलघमी, कासारी 77.52 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 71.15 दलघमी, पाटगाव 105.24 दलघमी, चिकोत्रा 42.72 दलघमी, चित्री 53.385 दलघमी, जंगमहट्टी 34.650 दलघमी, घटप्रभा  42.612  दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल पा) 6.060 दलघमी असा आहे.


          तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 16.6 फूट, सुर्वे 17.11 फूट, रुई 44.2 फूट, इचलकरंजी 42 फूट, तेरवाड 38.9 फूट, शिरोळ 31.6 फूट, नृसिंहवाडी 27 फूट, राजापूर 17.6 फूट तर नजीकच्या सांगली 9  फूट व अंकली 10.6 फूट अशी आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->