उमरगा येथील ईदगाह फंक्शन हॉलचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 10, 2020

उमरगा येथील ईदगाह फंक्शन हॉलचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर

उमरगा दि. १० : समाजातील सुजाण व्यक्तींनी कोरोना संकटाच्या काळात शासन आणि प्रशासन यांच्यावर अवलंबून न राहता या महामारीचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, येथील  मुस्लिम युवकांनी समाजातील नागरिकांच्या मदतीने व सहकार्याने उमरगा शहरानजीकच्या ईदगाह येथील फंक्शन हॉलला एका उत्तम सुविधायुक्त  कोविड केंद्रात परिवर्तन करून आदर्श निर्माण केला, असे मत उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी व्यक्त केले.

उमरगा शहराजवळ असलेल्या ईदगाह मैदानावर असलेल्या सभागृहात सर्व सोईनी युक्त अश्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन सोमवारी दि १० रोजी करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी तहसीलदार संजय पवार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक बडे, नोडल अधिकारी डॉ. विक्रम  आळंगेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, शिवसेना नेते जितेंद्र शिंदे, डॉ. उदय मोरे, नगराध्यक्षा सौ. प्रेमलता  टोपगे, दिलीप भालेराव, राजेंद्र हुंजे, रोटरीचे सचिव अनिल मदनसुरे, नगरसेवक, व्यापारी व  नागरिक उपस्थित होते. 

सर्वसोयियुक्त हे कोरोना केंद्र उत्तम प्रकारे चालवून दाखवु अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. यावेळी  आर्ट ऑफ  लिव्हिन्ग यांच्या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्यूमन व्हॅल्यूझ या संस्थेच्या वतीने या कोव्हीड सेंटर साठी १० पीपीई किट देण्यात आले. ३५ बेडचे केंद्र असून सोशल मीडियातुन  ग्रूपच्या माध्यमातून आवाहन केल्यावर मोठ्या  प्रमाणात आर्थिक मद्त मिळाली. 

याकरिता बाबा जाफरी,  जाहेद मुल्ला,  कलीम पठान, खाजा मुजावर, अय्युब मौलाना,  हाफिज, अस्लमभाइ शेख, फिरोज लाला, नसीर खान,  अज़हर शेख, अमजद मनियार,  मनीष सोनी आदी    तरुणांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबा जाफरी यांनी केले, सूत्रसंचालन मनिष सोनी तर आभार खाजा मुजावर यांनी मानले.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->