यावर्षी पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, August 14, 2020

यावर्षी पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

 

पुणे  : यावर्षी संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी देणे शक्य नसल्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार दि. १४ ऑगस्ट रोजी पुण्यात झालेल्या आढावा बैठकीत सांगितले. 


अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात झालेल्या कोरोना निर्मूलन आढावा बैठक झाली. पुढे अजित पवार म्हणाले कि, 'पुणे व पिंपरी- चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची घट होण्याचे प्रमाण वाढते आहे. ही एक खूप सकारात्मक आणि समाधानकारक बाब आहे. मात्र, कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. त्यामुळे, आपण सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, एकीकडे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करताना दुसरीकडे कोरोनाबाधितांना वेळेवर उपचार मिळणे देखील महत्वाचे आहे, असे सांगून पुण्यात यंदा सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी देणे शक्य नाही', असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. 


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->