नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोरोनामुक्त झाले आहेत. अमित शहा यांनी स्वत: ट्वीट करुन याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्याला योग्य प्रतिसादही मिळत असल्याने ते कोरोना मुक्त झाले आहेत.
मित शहा यांनी ट्वीट करुन म्हटलं, "आज माझ्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मी परमेश्वराचे आभार मानतो आणि या काळात ज्यांनी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आता डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस होम आयसोलेशनमध्ये राहणार आहे.

No comments:
Post a Comment