उस्मानाबाद : सध्या राजकारणापेक्षा कोरोना विरूध्दच्या लढाईला अधिक महत्व असून मृत्युदर कमी करणे हेच उद्दिष्ट असल्याचे जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंकरराव गडाख म्हणाले.
वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला शुक्रवार दि. 14 रोजी पालकमंत्री ना. गडाखी यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी कळंब येथील कोवीड सेंटरला भेट देवून पाहणी केली. याप्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे - पाटील, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे, उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, नायब तहसिलदार अस्लम जमादार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. जीवन वायदंडे, डॉ. स्वप्नील शिंदे यांची उपस्थिती होती..
यावेळी ना. गडाख यांनी या केंद्रातील रुग्णांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या0 तसेच त्या तात्काळ सोडविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर आरोग्य विभागाचे काम योग्य रित्या चालू असून रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत आहेत. जिल्हा प्रशासन देखील वेळी योग्य निर्णय घेतात असे सांगत गडाख यांनी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले.
या नंतर पत्रकाराशी बोलताना पालकमंत्री गडाख म्हणाले की, सध्या राजकारणापेक्षा कोरोनाला हरविण्याला आम्ही प्राधान्य देतो. जिल्ह्यातील वाढता मृत्युदर कमी करण्याचे कशोशीचे प्रयत्न सुरू आहेत, नागरिकांचा जीव महत्वाचा आहे. यासाठी प्रशासन जे निर्णय घेतात ते योग्य आहेत, असे सांगितले.

No comments:
Post a Comment