जुन्नर, दि. 28 : पिकअप व टेम्पोची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातील जुन्नरमध्ये कल्याण-नगर महामार्गावरील वडगाव आनंद येथे आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जितो टेम्पो क्रमांक MH 16 CC 6388 मुंबईकडून आळेफाटा बाजूस येत होता. तर आयशर टेम्पो MH 16 AE 9080 आळेफाटा बाजुकडून कल्याण दिशेने जात होता. या दोघा वाहनांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोघांचा घटनास्थळी जागीच मृत्यु झाला आहे. तर एकाचा आळेफाटा इथल्या रुग्णालयात तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मृतांमधे जितोच्या चालक व वाहकासह अन्य दोघांचा समावेश आहे. तर आयशरचा चालक किरकोळ जखमी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.

No comments:
Post a Comment