सलग दुसऱ्या दिवशी देशात रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, August 28, 2020

सलग दुसऱ्या दिवशी देशात रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद



नवी दिल्ली, दि. 28 : दिवसेंदिवस देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासात 77 हजार 266 नवीन रुग्ण वाढले असून 1 हार 057 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण 33 लाख 87 हजार 501 वर पोहचली आहे. यापैकी 7.45 लाख रुग्णावर उपचार सुरु असून 25.8 लाख रुग्ण बरे झाले आहेत. तसेच गेल्या 24 तासांत 60 हजार रुग्ण निरोगी होऊन घरी परतले आहेत.


गुरुवारी देशात 75 हजार रुग्ण आढळून आल्यानंतर आज पुन्हा एकदा कोरोनानं रेकॉर्ड मोडला आहे. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील हा आकडा सर्वात जास्त आहे. याआधी अमेरिकेत 25 जुलै रोजी 78 हजार 427 आणि 17 जुलै रोजी 76 हजार 730 रुग्ण एका दिवसात सापडले होते. त्यानंतर आता भारतातील रुग्णांचा आकडा आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->