मुंबई : संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळन करत श्री गणरायाचे आगमन होत आहे. काही ठिकाणी आज पहाटेपासून बाप्पाचं आगमन होत आहे.
संसर्गजन्य कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर बंधनं आली आहेत. पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून बाप्पाचं आगमन केलं तर कोरोना संसर्गाची भीती आहे. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक निघणार नाही.
दरम्यान, पुण्यातही आज मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे. मात्र, मानाच्या गणपतीसह कुठल्याही गणपतीचं भाविकांना दर्शन घेता येणार नाही.

No comments:
Post a Comment