नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये पोलिसांनी एका आयसीसच्या दशतवाद्याला अटक केली आहे. देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह साजरा होत असताना मोठं विघ्न टळलं आहे. गुप्तचर यंत्रणेकडून यासंदर्भात माहिती मिळाली होती. य़ा दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात IED स्फोटकांचं साहित्य जप्त करण्यात आली आहेत.
अब्दुल युसूफ असं या दहशतवाद्याचं नाव आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीच्या धौला कुआ भागातून ISIS शी संबंधित असलेल्या या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आणि अब्दुल युसूफमध्ये चकमक झाली. 6 वेळा गोळीबार केल्यानंतर युसूफला पकडण्यात पोलिसांना यश मिळाल असून या दहशतवाद्याकडे मोठ्या प्रमाणात इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवायसेज (IEDs) आढळल्याची माहिती डीसीपी प्रमोश सिंह कुशवाहा यांनी दिली.

No comments:
Post a Comment