नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यासह देशभरात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून कोरोना संकटाच्या सावटाखाली सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून राज्यभरात बाप्पाचं आगमन होत आहे.
गणपती बाप्पा मोरया... म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणपती बाप्पा आनंद आणि भरभराटी घेऊन येईल, असेही मोदींनी म्हटले आहे. संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवात ढोल-बाजा-ताशांचा आवाज नाही. मात्र गणरायाच्या स्वागतासाठी भक्तांची जय्यत तयारी दिसून येत आहे.

No comments:
Post a Comment