एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटी बसेसला सरकारची परवानगी - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, August 19, 2020

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटी बसेसला सरकारची परवानगी

 

मुंबई, 19 : राज्यातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षा घेता व अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर राज्यात एसटी बसेसला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याकरीता ई-पासची आवश्यकता नाही. त्यामुळे एसटी बस सेवा सुरू होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


मिशन बिगेन अगेन 6 अंतर्गत राज्य सरकारने एक परिपत्रक जारी केलं असून राज्यातील बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुठल्याही परवानगीची अथवा ई-पासची आवश्यकता नसणार आहे. त्यामुळे, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


संसर्ग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटीची सेवा 23 मार्चपासून बंद करण्यात आली होती. दरम्यान, 22 मे पासून राज्यात जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली होती. आपल्या मूळ गावी जाण्यासाठी आतुरलेले अनेक चाकरमानी शहरातच अडकून बसले आहेत.. हक्काची लालपरीही बंद असल्याने लोकांचे मोठे हाल झाले. मात्र आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एस बस सेवेला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी ईपासही गरज नसेल. मात्र खासगी चारचाकी वाहनांसाठी मात्र ईपास आवश्यक असणार आहे.


2 comments:

  1. कोणत्या तारखेपासून बस चालू होणार आहे

    ReplyDelete
    Replies
    1. दि. २० ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

      Delete

Post Top Ad

-->