परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वेला मोठा प्रतिसाद - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 31, 2020

परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वेला मोठा प्रतिसाद

 


रत्नागिरी, दि. 31 : मुकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गेल्या चार महिन्यापासून कोकणातील आपल्या गावीच राहिलेले हजारो चाकरमानी गणेशोत्सवानंतर मुंबईलत परत जाऊ लागल्याने कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या खास गाडयांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे.


मध्य आणि पश्चिम रेल्वेतर्फे खास गणेशोत्सवासाठी मुंबईहून जादा गाडया सोडण्यात आल्या होत्या. पण या गाड्यांचे वेळापत्रक उशीरा जाहीर झाल्यामुळे फार प्रतिसाद मिळाला नाही. आता हा उत्सव संपल्यानंतर मात्र मुंबईकडे परत जाण्यासाठी चाकरमानी या गाड्यांचा उपयोग करत आहेत. गौरी-गणपती विसर्जनानंतर दुस-याच दिवशीपासून रेल्वे गाडयांनी प्रवास करणा-यांची संख्या वाढू लागली आहे. दिवसाला चार गाडया कोकणातून मुंबईकडे रवाना होत असून त्यांच्या आरक्षित तिकिटांसाठी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे कोरे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


गेल्या गुरुवारी गौरी-गणपती विसर्जन झाले. त्यानंतर चाकरमानी मुंबईकडे परतू लागले आहेत. एसटीबरोबरच रत्नागिरी, सिंधुदुर्गातील प्रवाशांचा रेल्वेकडेही कल आहे. गेले दोन दिवस कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या आरक्षित तिकिटांसाठी प्रवाशांचा जास्त प्रतिसाद आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकातून दोनशे ते अडीचशे प्रवासी दिवसभरातील प्रत्येक गाडीतून रवाना होत होते.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->