खासदार नवनीत राणांना उपचारासाठी मुंबईला हलविले - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, August 13, 2020

खासदार नवनीत राणांना उपचारासाठी मुंबईला हलविले

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा या उपचारासाठी नागपूरवरुन मुंबईला रवाना झाल्या आहेत. नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरु होते. नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना आता मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.


आमदार रवी राणादेखील त्यांच्यासोबत मुंबईला रवाना होणार आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू होते. मात्र त्रास वाढल्याने त्या आता मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार आहेत. श्वास घ्यायला त्रास होत असून नवनीत राणा यांच्या छातीत मोठ्या प्रमाणावर दुखतं असल्याची माहिती मिळाली आहे.


नवनीत राणा यांच्या मुला-मुलीसह 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. यानंतर नवीनत राणाही कोरोना पॉझिटिव्ह आल्या. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे पती आमदार रवी राणा यांनाही संसर्ग झाला होता. सासु-सासऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->