रायगड : उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--
सोमवार, दि.10 ऑगस्ट, 2020 रोजी, सकाळी 8.00 वा. सुनिती शासकीय निवासस्थान, मुंबई येथून अलिबागकडे प्रयाण. स.11.00 वा.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव. स.11.20 वा. शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालय, रायगडकडे प्रयाण. स.11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे आगमन व जिल्हा शांतता कमिटी बैठकीस उपस्थिती. स्थळ : राजस्व सभागृह, अलिबाग. दुपारी 1.30 अलिबाग येथून खोपोलीकडे प्रयाण. दु.3.00 वा. खोपोली येथे आगमन व खोपोली न.पा.कोविड केअर सेंटरची पाहणी. स्थळ : के.एम.सी.कॉलेज, खोपोली. सोईनुसार सुतारवाडी ता.रोहा कडे प्रयाण, आगमन व राखीव.
मंगळवार, दि. 11 ऑगस्ट, 2020 रोजी, सकाळी 11.00 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून घोटवळ, ता.माणगावकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. घोटवळ ता.माणगाव येथे आगमन व कै.कुचेकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. दुपारी 1.30 वा. म्हसळा येथे आगमन व कै.हलदे यांचे कुटुंबियांची सात्वनपर भेट. सोईनुसार सुतारवाडी ता.रोहा कडे प्रयाण, आगमन व राखीव.
बुधवार दि. 12 ऑगस्ट, 2020 रोजी, सकाळी 8.00 वा सुतारवाडी ता.रोहा येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

No comments:
Post a Comment