अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत याचिकांवर शुक्रवारी होणार सुनावणी - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 10, 2020

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत याचिकांवर शुक्रवारी होणार सुनावणी

 

नवी दिल्ली, दि. 10 : विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याबाबत याचिकांवर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता शुक्रवार दि. १४ ऑगस्ट रोजी होणार आहे. दिल्ली व महाराष्ट्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तरासाठी यूजीसीने वेळ मागून घेतला.


वाढत्या कोरोनाचा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र विद्यापीठ अनुदान अर्थात यूजीसीने सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती. या यूजीसीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकल्यानंतर या प्रकरणावर आता अन्य राज्यांचे मतं जाणून घेणार आहे आणि त्यानंतर निर्णय देईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी देशभरातील महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याच्या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->