परभणी : परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
खा. संजय जाधव यांनी राजीनाम्यासोबत एक पत्रदेखील पाठवले आहे. त्या पत्रामध्ये परभणीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मतभेद असून राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत संजय जाधव यांनी पत्रात व्यथा मांडल्या आहेत.

No comments:
Post a Comment