माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना १० ऑगस्ट या दिवशी रात्री दिल्लीतील लष्करी छावणीत असलेल्या लष्कराच्या रिसर्च अॅण्ड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूत रक्ताची गाठ असल्याचे डॉक्टरांना आढळले. त्यानंतर त्यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली.
त्यानंतर त्यांच्या तब्ब्येत खालावत गेली. त्यांना काही काळ व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. पण त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला नाही. दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

No comments:
Post a Comment